रविवार, २३ फेब्रुवारी, २०१४

बेसिक माहिती :

'लगे रहो मुन्नाभाई' मधील 'गुड मॉर्निंग मुंबई' म्हणारी विद्या बालन सगळ्यांच्याच लक्षात आहे. तुमचं आवडतं गाणं इतरांना ऐकवण्याचा आनंद आणि पगार मिळवून देणारं एकमेव क्षेत्र म्हणजे रेडिओ जॉकी. इथे काम करताना तुमची ओळख तुमच्या दिसण्यावरून नाही, तर फक्त तुमच्या आवाजावरून होते. 

एफएम चॅनल्सच्या बूममुळे आरजे हे क्षेत्र चांगलंच स्थिरावलं. रेडिओ मिरची, रेडिओ सिटी, रेड एफएम यासारख्या अनेक चॅनल्समुळे आज आरजे म्हणून करिअर करण्यासाठी चांगल्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. 

ज्यांना म्युझिकची आवड आहे आणि सतत इतरांशी बोलण्याचा स्टॅमिना आणि आवड असेल, तर आरजे हे क्षेत्र तुमच्यासाठी नक्कीच चांगले  आहे. येत्या दहा वर्षांत एफएम चॅनल्सच्या संख्येत वाढ होईल, असा अंदाज या क्षेत्राशी संबंधित तज्ज्ञांनी व्यक्त केला असल्याने या क्षेत्रात करिअर करण्यासाठी अनेक संधी आहेत. 

रेडिओ हे फक्त ऐकण्याचं (ऑडिओ मीडियम) माध्यम आहे. टीव्हीप्रमाणे आरजे आपल्याला दिसत नाही. तरीही आपण एकमेकांच्या समोर आहोत, अशा पद्धतीने आरजेला प्रेक्षकांशी संवाद साधावा लागतो. आरजे हा त्या चॅनलचा ब्रॅण्ड अॅम्बेसेडर असतो. त्यामुळे सामान्यांमध्ये आपलं चॅनल लोकप्रिय बनवण्याची जबाबदारी आरजेवरच असते. 

पात्रता आणि आवश्यक स्किल्स : 


या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी शैक्षणिक पार्श्वभूमी महत्त्वाची नसली, तरी बेसिक क्वॉलिफिकेशन म्हणून ग्रॅज्युएशन पूर्ण असणं आवश्यक आहे. 

> वय ३५ वर्षांहून अधिक नसावं. 

> आवाजावर प्रभुत्व, भाषेचं ज्ञान असणं आवश्यक 

> स्पष्ट उच्चार आवश्यक 

> हजरजबाबीपणा 

> जनरल नॉलेज 

> एण्टरटेन्मेण्ट इण्डस्ट्रीतील हॅपनिंग्जचे अपडेट्स माहीत असायला हवेत. 

> संगीताची आवड आणि यातील सर्व माहिती 

कोसेर्स : 


अजून या क्षेत्राचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण उपलब्ध झालेलं नाही, तरीही काही इन्स्टिट्यूटस आणि युनिव्हसिर्टीमध्ये रेडिओ जॉकीचं ट्रेनिंग देणारे कोसेर्स उपलब्ध आहेत. 

या प्रत्येक संस्थेतील प्रशिक्षण कार्यक्रमाचा कालावधी वेगवेगळा आहे. दोन महिन्यांच्या सटिर्फिकेट कोर्सपासून एक वर्षाच्या पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सचा यात समावेश आहे. याशिवाय व्हॉअसओव्हरचे क्रॅश कोर्सही करता येतील. 

आरजेचं औपचारिक शिक्षण या क्षेत्रात करिअर करण्यासाठी पुरेसं नाही. आत्मविश्वास आणि इतरांशी संवाद साधत त्यांचं मनोरंजन करण्याची कलाही अवगत असायला हवी. यासाठी वेगवेगळ्या टीव्ही आणि रेडिओ चॅनल्सवरील अँकर्सचं निवेदन ऐकणं नक्कीच फायद्याचं ठरू शकतं. 

करिअरच्या संधी : 

आज अनेक एफएम चॅनल्स आणि प्रायव्हेट रेडिओ चॅनल्स कार्यरत आहेत. इथे आरजे म्हणून नोकरी करता येईल. या क्षेत्रात फ्रेशर्सना ७ ते १५ हजार रुपये पगार मिळतो. पण, एकदा का आरजे म्हणून जनमानसात तुमची ओळख निर्माण झाली, की तुमची ही किंमत नक्कीच वाढते. 

आरजेच्या कामाव्यतिरिक्त व्हॉइसओव्हर, रेडिओ/टीव्ही आणि कॉपोर्रेट हाऊससाठी अॅडव्हर्टायजेमण्ट्सच्या जिंगल्स करण्याचं कामही मिळू शकतं. 

प्रशिक्षण संस्था : 


ऑल इंडिया रेडिओमध्ये त्यांच्या आरजेना मार्गदर्शन करण्यासाठी दोन महिन्यांचा इन हाऊस ट्रेनिंग प्रोग्राम असतो. याशिवाय ऑल इंडिया रेडिओ, चंदीगढ इथे आठवड्याचा ट्रेनिंग प्रोग्राम असतो. 

द टेक वन अॅकॅडमी ऑफ ब्रॉडकास्टिंग, चंदीगढ इथे स्थानिक स्तरावरील ऑल इंडिया रेडिओ चॅनलवर ट्रेनी आरजेना कार्यक्रम सादर करण्याची संधी दिली जाते. 

द मुदा इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन्स, अहमदाबाद इथे एक वर्ष कालावधीचा ब्रॉडकास्टिंग मॅनेजमेण्ट कोर्स आहे. 

झेविअर्स इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन्स, मुंबई इथे अनाऊन्सिंग, ब्रॉडकास्टिंग, कॉम्पेरिंग अॅण्ड डबिंग कोर्स उपलब्ध आहे. 

ईएमडीआय एन्कम्पास इन्स्टिट्यूट ऑफ रेडिओ मॅनेजमेण्ट, आयईएस मॅनेजमेण्ट कॉलेज कॅम्पस, लिलावती हॉस्पिटल, वांदे रेक्लमेशन, मुंबई ५०. इथे डिप्लोमा इन रेडिओ प्रोग्रामिंग अॅण्ड मॅनेजमेण्ट हा सहा महिने कालावधीचा पार्टटाइम कोर्स उपलब्ध आहे. बारावीनंतर या कोर्सला प्रवेश घेता येतो. एण्ट्रन्स टेस्ट आणि इण्टरव्ह्यूमध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांना या कोर्सला प्रवेश मिळतो. 

याशिवाय डिप्लोमा इन आरजे हा बारावीनंतर करता येणारा कोर्सही इथे आहे. या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी व्हॉइस टेस्ट आणि इण्टरव्ह्यू द्यावा लागतो. 

पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेण्ट हा आठ महिने कालावधीचा कोर्स ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना करता येईल. एण्ट्रन्स टेस्ट आणि इण्टरव्ह्यूमध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांना या कोर्सला प्रवेश मिळतो. याशिवाय सटिर्फिकेट कोर्स इन रेडिओ जॉकिंग हा तीन महिन्याचा पार्टटाइम कोर्स अण्डरग्रॅज्युएट विद्यार्थ्यांना करता येईल. यासाठी इण्टरव्ह्यू पास करणं आवश्यक आहे. 

अॅकॅडमी ऑफ रेडिओ मॅनेजमेण्ट, दिल्ली इथे एक वर्षाचा तसंच तीन महिन्याचा डिप्लोमा कोर्स इन आरजे, म्युझिक मॅनेजमेण्ट, सेल्स, माकेर्टिंग अॅण्ड प्रोडक्शन उपलब्ध आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

Subscribe to RSS Feed Follow me on Twitter!