विक्रीकर हा राज्य सरकारच्या अखत्यारीत येतो. व्यापारी, उद्योजक यांच्याकडून विक्रीकराची वसुली, पडताळणी करणे यासाठी विक्रीकर निरीक्षकांची नेमणूक राज्य सरकारच्या वतीने केली जाते. मुंबई व अन्य मोठय़ा महानगरांमधून मोठय़ा प्रमाणावर व्यापार होत असल्याने या महानगरांमध्ये विक्रीकर निरीक्षकांच्या जागा मोठय़ा प्रमाणावर असतात. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे ‘विक्रीकर निरीक्षक’पदासाठी (सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर) ही परीक्षा घेण्यात येते. यशस्वी उमेदवारांची नियुक्ती राज्य सरकारच्या विक्रीकर विभागात करण्यात येते.
विक्रीकर निरीक्षकानंतर विक्रीकर अधिकारी, साहाय्यक विक्रीकर आयुक्त, विक्रीकर उपायुक्त यांसारख्या पदावर बढतीच्या संधी उपलब्ध होतात.
वेतनश्रेणी : रु. ९३००-३४८००, ४३०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते.
एकूण वित्तलब्धी अंदाजे रु.२१,७५२/-.
वयोमर्यादा : १९ ते ३३ वर्षे (राखीव वर्गासाठी कमाल वयोमर्यादा ३८ वर्षे)
२) मुख्य परीक्षा - ४०० गुण
३) मुलाखत - ५० गुण
पूर्वपरीक्षा ही मुख्य परीक्षेसाठी मर्यादित उमेदवारांची निवड करण्यासाठी घेतली जाते.
शुल्क :
पूर्वपरीक्षा - २६० रु. (खुल्या वर्गासाठी) १३५ रु. (राखीव वर्गासाठी)
मुख्य परीक्षा- ३१० रु. (खुल्या वर्गासाठी), १६० रु. (राखीव वर्गासाठी)
भूगोल (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह) पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश-रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या-उद्योगधंदे.
भारताचा सामान्य इतिहास - १८५७ ते १९४७
नागरिकशास्त्र व अर्थव्यवस्था - भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्यव्यवस्थापन (प्रशासन),
ग्रामव्यवस्थापन (प्रशासन), भारतीय पंचवार्षकि योजनेची वैशिष्टय़े
सामान्य विज्ञान - भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, आरोग्यशास्त्र
महाराष्ट्रातील समाजसुधारक - गोपाळ गणेश आगरकर, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, महर्षी धोंडो केशव कर्वे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
चालू घडामोडी - देशविदेशाच्या घडामोडी
एकूण गुण - ४००, प्रश्नपत्रिकांची संख्या - दोन, कालावधी प्रत्येकी दोन तास.
प्रत्येक प्रश्नपत्रिकेचा तपशील खालीलप्रमाणे-
पेपर २ - सामान्य ज्ञान, बुद्धिमापन व विषयाचे ज्ञान - या विषयामध्ये खालील घटक / उपघटकांचा समावेश असेल.
१) चालू घडामोडी (३० गुण):- जागतिक तसेच भारतातील.
२) बुद्धिमत्ता चाचणी (४० गुण) - अंकगणित, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, सरासरी, दशांश व अपूर्णाक, तसेच बुध्दय़ांकमापनाशी संबंधित प्रश्न.
३) महाराष्ट्राचा भूगोल (३० गुण) - महाराष्ट्राचा रचनात्मक भूगोल, मुख्य रचनात्मक विभाग, हवामान, पर्जन्यमान व तापमान, पर्जन्यातील विभागवार बदल, नद्या, पर्वत व डोंगर, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नसíगक संपत्ती - वने व खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल - लोकसंख्या, लोकसंख्येचा स्थलांतर व त्याचे स्रोत आणि त्या ठिकाणावरील परिणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्टय़ा व त्यांचे प्रश्न.
४) नियोजन (१५ गुण) : प्रक्रिया, प्रकार, भारताच्या पहिल्या ते दहाव्या पंचवार्षकि योजनेचा आढावा, मूल्यांकन, सामाजिक व आíथक विकासाचे निर्देशफलक, राज्य आणि स्थानिक पातळीवरील नियोजन, विकेंद्रीकरण, ७३ व ७४वी घटनादुरुस्ती, भारतीय अर्थव्यवस्था, क्षेत्रीय विकासाचा कल व सेवा क्षेत्राची रूपरेषा, भारतीय अर्थव्यवस्थेच्या समोरील आव्हाने, गरिबी, बेरोजगारी आणि प्रादेशिक असमतोल.
५) शहरी व ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास (१० गुण) : पायाभूत सुविधांची गरज आणि महत्त्व, सामाजिक व altआíथक पायाभूत सुविधांचा विकास आणि वाढ - जसे ऊर्जा, पाणीपुरवठा व मलनि:सारण, गृह, परिवहन (रस्ते, बंदर इत्यादी), दळणवळण (पोस्ट व तार, दूरसंचार), रेडिओ, टी.व्ही., इंटरनेट क्रायसिस, भारतातील इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रश्न व या संबंधीचे धोरण व त्यावरील पर्याय; खासगी व सार्वजनिक क्षेत्रातील भागीदारी, एफ.डी.आय. आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर विकासाचे खासगीकरण, राज्य व केंद्र सरकारचे इन्फ्रास्ट्रक्चर विकासाचे धोरण, ग्रामीण व शहरी भागातील परिवहन व गृह या विषयीचे प्रश्न व त्यावरील केंद्र व राज्य सरकारचे कार्यक्रम व उपक्रमशीलता.
६) आर्थिक सुधारणा (१० गुण) :- पाश्र्वभूमी, उदारीकरण, जागतिकीकरण संकल्पना व त्याचा अर्थ आणि व्याप्ती, मर्यादा, केंद्र व राज्य स्तरावरील आíथक सुधारणा, WTO, तरतुदी आणि सुधारणा आणि त्याचे भारतीय अर्थव्यवस्थेवरील अपेक्षित परिणाम, प्रश्न व समस्या.
७) आंतरराष्ट्रीय व्यापार व आंतरराष्ट्रीय भांडवल चळवळ (१५ गुण) : -
जागतिकीकरणाच्या युगातील सूत्र व कल, वाढ, रचना आणि भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराची दिशा, भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापाराचे धोरण, निर्यातीतील वाढ, WTO आणि आंतरराष्ट्रीय व्यापार विदेशी भांडवलाचा अंतप्रवाह, रचना व वाढ, FDI व्यापार, बहुआंतरराष्ट्रीय भांडवल पुरवणाऱ्या संस्था, IMF जागतिक बँक, IDA इंटरनॅशनल क्रेडिट रेटिंग.
८) सार्वजनिक वित्त व्यवस्था (२५ गुण) :- महसुलाचे साधन, टॅक्स, नॉनटॅक्स, भारतातील केंद्र व राज्यातील सार्वजनिक ऋण, केंद्र व राज्याची सार्वजनिक खर्च वाढ, सार्वजनिक खर्च सुधारणा कामावर आधारित अर्थसंकल्प, शून्याधारित अर्थसंकल्प, भारतातील करसुधारणा आढावा, राज्य पातळीवरील करसुधारणा VAT सार्वजनिक ऋण वाढ, रचना आणि भार, राज्याची कर्जबाजारीपणाची केंद्राला समस्या, राजकोषीय तूट, संकल्पना, तुटीचे नियंत्रण, केंद्र, राज्य व रिझव्र्ह बँकेचे उपक्रम, भारतातील राजकोषीय सुधारणा, केंद्र व राज्यस्तरावरील आढावा.
९) संगणक व माहिती तंत्रज्ञान (२५ गुण) :- आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, वेगवेगळया क्षेत्रांतील जीवनात संगणकाचा वापर, डाटा कम्युनिकेशन, नेटवर्किंग व वेब टेक्नॉलॉजी, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध, नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा निरनिराळ्या सेवा सुविधांची माहिती मिळण्यासाठी होणारा उपयोग, भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व त्याचा दर्जा, शासनाचे कार्यक्रम, जसे मीडिया लॅब एशिया, विद्या वाहिनी, ज्ञान वाहिनी, सामूहिक माहिती केंद्र इत्यादी, माहिती तंत्रज्ञान उद्योगातील मूलभूत प्रश्न व त्याचे भवितव्य.
मुलाखत
मुख्य परीक्षेतील यशस्वी उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावलं जातं. मुलाखतीसाठी ५० गुण असतात. उमेदवारांची निवड मुख्य परीक्षा व मुलाखती यामध्ये मिळालेल्या गुणांनुसार करण्यात येते.
- मुख्य परीक्षेच्या स्वरूप व अभ्यासक्रमाकडे पाहिल्यास आपल्याला लक्षात येईल की, गुणांच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा विषय मराठी (१३० गुण) आहे. त्या खालोखाल महत्त्व इंग्रजी विषयाचे (७० गुण)आहे. दोन्ही विषयांवर प्रश्न हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पद्धतीचे असतात.
- मराठी विषयामध्ये व्याकरणावरील प्रश्न विचारले जातात. म्हणी, वाक्प्रचार, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्द संधी, प्रयोग, विशेषण, नाम, सर्वनाम, लिंग, शब्द समूहासाठी पर्यायी योग्य शब्द निवडणे, विभक्ती, भाषेतील चिन्हांचा वापर, स्वर - व्यंजन, वाक्य प्रकार, समास, उताऱ्यावरील प्रश्न यावर प्रश्न विचारले जातात. शालेय अभ्यास व स्कॉलरशिप परीक्षेसाठीची मराठी व्याकरणाची पुस्तके अभ्यासावीत.
- इंग्रजी भाषेवरील प्रश्नदेखील व्याकरणावर आधारित असतात. त्यासाठी शालेय अभ्यासातील इंग्रजी व्याकरणाची पुस्तके वाचावीत
- मुख्य परीक्षेतील दुसऱ्या प्रश्नपत्रिकेच्या अभ्यासक्रमासाठी बुद्धिमत्ता चाचणीसाठी - चौथी व सातवी स्कॉलरशिपची पुस्तके अभ्यासावीत.
- नियोजन, शहरी व ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास, आíथक सुधारणा, आंतरराष्ट्रीय व्यापार व आंतरराष्ट्रीय भांडवल चळवळ, सार्वजनिक वित्त व्यवस्था हे घटक अर्थशास्त्राशी संबंधित आहेत. याच्या मूलभूत संज्ञासाठी अर्थशास्त्राची शालेय (एन.सी.ई.आर.टी.) व महाविद्यालयीन स्तरावरील पुस्तके वाचावीत. सरकारी योजनांसंबंधित माहितीसाठी योजना, लोकराज्य ही मासिके नियमित वाचावीत. योजना मासिकाचे जुने अंक योजना मासिकाच्या (www.yojana.gov.in) वेबसाइटवर अर्काइव्हज् विभागात पीडीएफ फॉरमॅटमध्ये उपलब्ध आहेत. तेथून ते डाऊनलोड करून घेता येतील.
चालू घडामोडींसाठी वर्तमानपत्रे नियमित वाचावीत.
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेबसाइटवरून (www.mpsc.gov.in) जुन्या प्रश्नपत्रिका (गतवर्षीच्या प्रश्नपत्रिका), त्यांच्या उत्तरतालिका डाऊनलोड करता येतील.
विक्रीकर निरीक्षकानंतर विक्रीकर अधिकारी, साहाय्यक विक्रीकर आयुक्त, विक्रीकर उपायुक्त यांसारख्या पदावर बढतीच्या संधी उपलब्ध होतात.
वेतनश्रेणी : रु. ९३००-३४८००, ४३०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते.
एकूण वित्तलब्धी अंदाजे रु.२१,७५२/-.
वयोमर्यादा : १९ ते ३३ वर्षे (राखीव वर्गासाठी कमाल वयोमर्यादा ३८ वर्षे)
विक्रीकर निरीक्षकाची परीक्षा तीन टप्प्यांत घेण्यात येते.
१) पूर्वपरीक्षा - ३०० गुण२) मुख्य परीक्षा - ४०० गुण
३) मुलाखत - ५० गुण
पूर्वपरीक्षा ही मुख्य परीक्षेसाठी मर्यादित उमेदवारांची निवड करण्यासाठी घेतली जाते.
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त विद्यापीठाचे पदवीधर ही परीक्षा देऊ शकतात. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.शुल्क :
पूर्वपरीक्षा - २६० रु. (खुल्या वर्गासाठी) १३५ रु. (राखीव वर्गासाठी)
मुख्य परीक्षा- ३१० रु. (खुल्या वर्गासाठी), १६० रु. (राखीव वर्गासाठी)
पूर्वपरीक्षा स्वरूप :
प्रश्नपत्रिका १ असून, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा असते. प्रश्नांची संख्या १५० असून, एकूण गुण ३०० असतात. परीक्षेसाठी दीड तासाचा कालावधी असतो. प्रश्नपत्रिका इंग्रजी व मराठी माध्यमात असते. परीक्षेतील प्रश्नांचा दर्जा दहावीपर्यंतच्या अभ्यासावर आधारित असतो.पूर्वपरीक्षा अभ्यासक्रम :
अंकगणित - बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, सरासरी, दशांश, अपूर्णाक.भूगोल (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह) पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश-रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या-उद्योगधंदे.
भारताचा सामान्य इतिहास - १८५७ ते १९४७
नागरिकशास्त्र व अर्थव्यवस्था - भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्यव्यवस्थापन (प्रशासन),
ग्रामव्यवस्थापन (प्रशासन), भारतीय पंचवार्षकि योजनेची वैशिष्टय़े
सामान्य विज्ञान - भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, आरोग्यशास्त्र
महाराष्ट्रातील समाजसुधारक - गोपाळ गणेश आगरकर, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, महर्षी धोंडो केशव कर्वे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
चालू घडामोडी - देशविदेशाच्या घडामोडी
मुख्य परीक्षा
प्रश्नपत्रिकेचे स्वरूप - वस्तुनिष्ठ बहुपर्यायीएकूण गुण - ४००, प्रश्नपत्रिकांची संख्या - दोन, कालावधी प्रत्येकी दोन तास.
प्रत्येक प्रश्नपत्रिकेचा तपशील खालीलप्रमाणे-
मुख्य परीक्षा अभ्यासक्रम
पेपर १ - इंग्रजी व मराठी - सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ व उपयोग, तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे.पेपर २ - सामान्य ज्ञान, बुद्धिमापन व विषयाचे ज्ञान - या विषयामध्ये खालील घटक / उपघटकांचा समावेश असेल.
१) चालू घडामोडी (३० गुण):- जागतिक तसेच भारतातील.
२) बुद्धिमत्ता चाचणी (४० गुण) - अंकगणित, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, सरासरी, दशांश व अपूर्णाक, तसेच बुध्दय़ांकमापनाशी संबंधित प्रश्न.
३) महाराष्ट्राचा भूगोल (३० गुण) - महाराष्ट्राचा रचनात्मक भूगोल, मुख्य रचनात्मक विभाग, हवामान, पर्जन्यमान व तापमान, पर्जन्यातील विभागवार बदल, नद्या, पर्वत व डोंगर, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नसíगक संपत्ती - वने व खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल - लोकसंख्या, लोकसंख्येचा स्थलांतर व त्याचे स्रोत आणि त्या ठिकाणावरील परिणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्टय़ा व त्यांचे प्रश्न.
४) नियोजन (१५ गुण) : प्रक्रिया, प्रकार, भारताच्या पहिल्या ते दहाव्या पंचवार्षकि योजनेचा आढावा, मूल्यांकन, सामाजिक व आíथक विकासाचे निर्देशफलक, राज्य आणि स्थानिक पातळीवरील नियोजन, विकेंद्रीकरण, ७३ व ७४वी घटनादुरुस्ती, भारतीय अर्थव्यवस्था, क्षेत्रीय विकासाचा कल व सेवा क्षेत्राची रूपरेषा, भारतीय अर्थव्यवस्थेच्या समोरील आव्हाने, गरिबी, बेरोजगारी आणि प्रादेशिक असमतोल.
५) शहरी व ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास (१० गुण) : पायाभूत सुविधांची गरज आणि महत्त्व, सामाजिक व altआíथक पायाभूत सुविधांचा विकास आणि वाढ - जसे ऊर्जा, पाणीपुरवठा व मलनि:सारण, गृह, परिवहन (रस्ते, बंदर इत्यादी), दळणवळण (पोस्ट व तार, दूरसंचार), रेडिओ, टी.व्ही., इंटरनेट क्रायसिस, भारतातील इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रश्न व या संबंधीचे धोरण व त्यावरील पर्याय; खासगी व सार्वजनिक क्षेत्रातील भागीदारी, एफ.डी.आय. आणि इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर विकासाचे खासगीकरण, राज्य व केंद्र सरकारचे इन्फ्रास्ट्रक्चर विकासाचे धोरण, ग्रामीण व शहरी भागातील परिवहन व गृह या विषयीचे प्रश्न व त्यावरील केंद्र व राज्य सरकारचे कार्यक्रम व उपक्रमशीलता.
६) आर्थिक सुधारणा (१० गुण) :- पाश्र्वभूमी, उदारीकरण, जागतिकीकरण संकल्पना व त्याचा अर्थ आणि व्याप्ती, मर्यादा, केंद्र व राज्य स्तरावरील आíथक सुधारणा, WTO, तरतुदी आणि सुधारणा आणि त्याचे भारतीय अर्थव्यवस्थेवरील अपेक्षित परिणाम, प्रश्न व समस्या.
७) आंतरराष्ट्रीय व्यापार व आंतरराष्ट्रीय भांडवल चळवळ (१५ गुण) : -
जागतिकीकरणाच्या युगातील सूत्र व कल, वाढ, रचना आणि भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराची दिशा, भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापाराचे धोरण, निर्यातीतील वाढ, WTO आणि आंतरराष्ट्रीय व्यापार विदेशी भांडवलाचा अंतप्रवाह, रचना व वाढ, FDI व्यापार, बहुआंतरराष्ट्रीय भांडवल पुरवणाऱ्या संस्था, IMF जागतिक बँक, IDA इंटरनॅशनल क्रेडिट रेटिंग.
८) सार्वजनिक वित्त व्यवस्था (२५ गुण) :- महसुलाचे साधन, टॅक्स, नॉनटॅक्स, भारतातील केंद्र व राज्यातील सार्वजनिक ऋण, केंद्र व राज्याची सार्वजनिक खर्च वाढ, सार्वजनिक खर्च सुधारणा कामावर आधारित अर्थसंकल्प, शून्याधारित अर्थसंकल्प, भारतातील करसुधारणा आढावा, राज्य पातळीवरील करसुधारणा VAT सार्वजनिक ऋण वाढ, रचना आणि भार, राज्याची कर्जबाजारीपणाची केंद्राला समस्या, राजकोषीय तूट, संकल्पना, तुटीचे नियंत्रण, केंद्र, राज्य व रिझव्र्ह बँकेचे उपक्रम, भारतातील राजकोषीय सुधारणा, केंद्र व राज्यस्तरावरील आढावा.
९) संगणक व माहिती तंत्रज्ञान (२५ गुण) :- आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, वेगवेगळया क्षेत्रांतील जीवनात संगणकाचा वापर, डाटा कम्युनिकेशन, नेटवर्किंग व वेब टेक्नॉलॉजी, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध, नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा निरनिराळ्या सेवा सुविधांची माहिती मिळण्यासाठी होणारा उपयोग, भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व त्याचा दर्जा, शासनाचे कार्यक्रम, जसे मीडिया लॅब एशिया, विद्या वाहिनी, ज्ञान वाहिनी, सामूहिक माहिती केंद्र इत्यादी, माहिती तंत्रज्ञान उद्योगातील मूलभूत प्रश्न व त्याचे भवितव्य.
मुलाखत
मुख्य परीक्षेतील यशस्वी उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावलं जातं. मुलाखतीसाठी ५० गुण असतात. उमेदवारांची निवड मुख्य परीक्षा व मुलाखती यामध्ये मिळालेल्या गुणांनुसार करण्यात येते.
परीक्षेच्या तयारीसाठी टिप्स
- पूर्वपरीक्षेच्या अभ्यासाबरोबरीनेच मुख्य परीक्षेचा अभ्यास सुरू करावा. कारण पूर्वपरीक्षेचा निकाल व मुख्य परीक्षा यामध्ये साधारणत: दीड ते दोन महिने इतकेच अंतर असते.- मुख्य परीक्षेच्या स्वरूप व अभ्यासक्रमाकडे पाहिल्यास आपल्याला लक्षात येईल की, गुणांच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा विषय मराठी (१३० गुण) आहे. त्या खालोखाल महत्त्व इंग्रजी विषयाचे (७० गुण)आहे. दोन्ही विषयांवर प्रश्न हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पद्धतीचे असतात.
- मराठी विषयामध्ये व्याकरणावरील प्रश्न विचारले जातात. म्हणी, वाक्प्रचार, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्द संधी, प्रयोग, विशेषण, नाम, सर्वनाम, लिंग, शब्द समूहासाठी पर्यायी योग्य शब्द निवडणे, विभक्ती, भाषेतील चिन्हांचा वापर, स्वर - व्यंजन, वाक्य प्रकार, समास, उताऱ्यावरील प्रश्न यावर प्रश्न विचारले जातात. शालेय अभ्यास व स्कॉलरशिप परीक्षेसाठीची मराठी व्याकरणाची पुस्तके अभ्यासावीत.
- इंग्रजी भाषेवरील प्रश्नदेखील व्याकरणावर आधारित असतात. त्यासाठी शालेय अभ्यासातील इंग्रजी व्याकरणाची पुस्तके वाचावीत
- मुख्य परीक्षेतील दुसऱ्या प्रश्नपत्रिकेच्या अभ्यासक्रमासाठी बुद्धिमत्ता चाचणीसाठी - चौथी व सातवी स्कॉलरशिपची पुस्तके अभ्यासावीत.
- नियोजन, शहरी व ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास, आíथक सुधारणा, आंतरराष्ट्रीय व्यापार व आंतरराष्ट्रीय भांडवल चळवळ, सार्वजनिक वित्त व्यवस्था हे घटक अर्थशास्त्राशी संबंधित आहेत. याच्या मूलभूत संज्ञासाठी अर्थशास्त्राची शालेय (एन.सी.ई.आर.टी.) व महाविद्यालयीन स्तरावरील पुस्तके वाचावीत. सरकारी योजनांसंबंधित माहितीसाठी योजना, लोकराज्य ही मासिके नियमित वाचावीत. योजना मासिकाचे जुने अंक योजना मासिकाच्या (www.yojana.gov.in) वेबसाइटवर अर्काइव्हज् विभागात पीडीएफ फॉरमॅटमध्ये उपलब्ध आहेत. तेथून ते डाऊनलोड करून घेता येतील.
चालू घडामोडींसाठी वर्तमानपत्रे नियमित वाचावीत.
- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेबसाइटवरून (www.mpsc.gov.in) जुन्या प्रश्नपत्रिका (गतवर्षीच्या प्रश्नपत्रिका), त्यांच्या उत्तरतालिका डाऊनलोड करता येतील.
---
इंटरनेटवरून साभार

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा