रविवार, २३ फेब्रुवारी, २०१४

बेसिक माहिती


भारतात हॉटेल इंडस्ट्रीचा विस्तार वेगाने होत आहे. त्यासाठी प्रशिक्षित आणि अनुभवी लोकांची  गरज भासत आहे. हॉटेल मॅनेजमेंटचे प्रशिक्षण विविध इन्स्टिट्यूटमध्ये दिले जाते. त्यामध्ये सहा महिन्याचे कोर्सेस, डिप्लोमा आणि डिग्री कोर्सेसचा समावेश असतो. हॉटेल मॅनेजमेंटच्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना फूड अँड बेवरेजेस, वेटर, शेफ, रूम सर्व्हिस, हाउस किपिंग, पर्सनॅलिटी डेव्ह्लपमेंट, फ्रंट ऑफिस, आदींचे प्रशिक्षण दिले जाते. कामाचा प्रत्यक्ष अनुभव येण्यासाठी विद्यार्थ्यांना हॉटेलमध्ये प्रशिक्षणाची संधी दिली जाते. सेवा क्षेत्रात ज्यांना आवड आहे अशा युवांना हॉटेल मॅनेजमेंटमध्ये करियरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.

मुंबई, पुणे, दिल्ली, कोलकत्ता यांसारख्या अनेक मोठ्या शहरांमध्ये हॉटेल इंडस्ट्रीचा विस्तार होत आहे. यांसारख्या  शहरांमध्ये मोठ्या हॉटेलांसोबतच लहान हॉटेल्सची संख्या वाढताना दिसत आहे. हॉटेलमधील कामांसाठी कौशल्यपूर्ण मनुष्यबळाची आवश्यकता लागते. तुमच्याकडे हॉटेल क्षेत्रातील अनुभव आणि कौशल्य असेल आणि तुमचे शिक्षण झाले नसेल, तरी तुम्हाला हॉटेल  क्षेत्रात नोकरी मिळू शकते. तुम्ही हॉटेल क्षेत्रातील लहान कोर्सेस शिकून कौशल्ये आत्मसात करू शकता. हॉटेल मॅनेजमेंटमधील डिप्लोमा, डिग्री कोर्सेस केल्यास त्याचा व्यवसायिकदृष्ट्या फायदा होतो.

Syllabus


Communication Skill & I.T. (Eng & French) (P)
Food Production Principles (P)
Food and Beverage Services (P)
Accommodation Services (P)
Basic Principles of Accounting
Catering Science

Fundamentals of Management

हॉटेल मॅनेजमेंट साठी प्रशिक्षण संस्था :


(येथे जाहिरात देण्यासाठी संपर्क करा : ९५ ५२ ०१५५ ४२) 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

Subscribe to RSS Feed Follow me on Twitter!